Maharashtra Police : राज्यातील 2 हजार 772 पोलिसांना कोरोनाची लागण

2 thousand 772 policemen in state infected with Corona virus.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस दलातील 2 हजार 772 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 359 अधिकाऱ्यांचा तर 2 हजार 413 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर अनेक पोलिसांना कोरोना काळात आपले कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाल्याने जीव  गमवावा लागला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोरोनामुळे मृत्यू झालेले पोलीस – 

मुंबईतील 62 पोलीस व 7 अधिकारी अशा एकूण 69, नवी मुंबई 2, ठाणे शहर 17, पुणे शहर 3, नागपूर शहर 5, नाशिक शहर 2, अमरावती शहर 1 wpc, औरंगाबाद शहर 3, सोलापूर शहर 3, ठाणे ग्रामीण 3 व 1 अधिकारी, पालघर 2 व 1 अधिकारी, रायगड 3, पुणे ग्रामीण 2, सांगली 1, सातारा 2, कोल्हापूर 1, सोलापूर ग्रामीण 1, नाशिक ग्रामीण 5, जळगाव 2, अहमदनगर 3, उस्मानाबाद 1, बीड 1, जालना 1, बुलढाणा 1, मुंबई रेल्वे 4, पुणे रेल्वे अधिकारी 1, औरंगाबाद रेल्वे 1, SRPF Gr 3 जालना-1, SRPF Gr 9 -1, SRPF Gr 11 नवी मुंबई 1, SRPF Gr 4 -1 अधिकारी, ए.टी.एस. 1, PTS मरोळ अधिकारी 1, SID मुंबई 2 व 1 अधिकारी

लॉकडाऊनच्या काळात (22 मार्च ते 28 ऑगस्ट 2020) राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 43 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 34 हजार 17 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याच काळात 23 कोटी 36 लाख 44 हजार 394 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

कोरोनाकाळातील महत्वाची आकडेवारी –

# अत्यावश्यक सेवेसाठी पोलिसांकडून 8 लाख 3 हजार 320 पास देण्यात आले आहेत.

# पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – 340 (891 व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात)

# 100 नंबरवर आलेले फोन – 1 लाख 11 हजार 171

# राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा 829 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

# अवैध वाहतूक करणाऱ्या 1 हजार 347 वाहनांवर गुन्हे दाखल

# 96 हजार 64 वाहने जप्त केली

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.