Pimpri: च-होलीतील तीन वर्षाच्या मुलीसह दोन महिलांना कोरोनाची बाधा

2 women test positive for coronavirus including a 3 year old in Charholi today taking 49 active covid19 patients in city कोरोना बाधितांची संख्या 190 वर; 109 जणांची कोरोनावर यशस्वी मात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली परिसरातील तीन वर्षाच्या बाळासह दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 49 वर गेली आहे. शहरातील आणि पुण्यातील पण महापालिका रुग्णालयात दाखल झालेले अशा 190 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 109 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नऊ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोमवारी (दि. 11) शहरातील 197 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज सकाळी आले आहेत. त्यामध्ये च-होली परिसरातील तीन वर्षाच्या बाळाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 25 आणि 28 वर्षीय दोन महिलांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिका रूग्णालयात सक्रिय 49 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, पुण्यातील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेले आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अशा 190 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 109 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि 24 एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा,

6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात, भोसरीतील पुरुष रुग्णाचा 10 मे रोजी आणि 11 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाता अशा नऊ जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.