Lonavala News: बंगल्यातील स्विमिंग पुल मध्ये बुडून 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : लोणावळा शहरामध्ये आज 2 वर्षीय चिमुरडीचा बंगल्यातील स्विमिंग पुल मध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद वय- 1 वर्षे 11 महिने ह्या मृत चिमुरडीचे नाव आहे. याबाबत मोहम्मदनदिम कैसरहुसेन सैयद, वय- 31 वर्षे, धंदा- नोकरी, रा. प्लॅट नं. 503 मैक्सीमा बी कासाबेला गोल्ड़ पलवा डोंबिवली यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

आज सकाळी 09.15 वा सुमारास मिर्झा बंगलो, पिचली हिल बार्क हॉटेलचे पाठीमागे खंडाळा, लोणावळा ता. मावळ जि. पुणे येथील स्विमींग पुल मध्ये ही दुर्घटना झाली आहे.

फिर्यादी व सर्व कुटुंबिय सगळे नाष्टा करत असताना अचानक बाहेरुन ओरडण्याचा अवाज आला तेव्हा त्यांनी जावुन पाहिले असता त्यांची मुलगी – हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद वय- 1 वर्षे 11 महिने ही स्विमींग पुल मध्ये पाण्यामध्ये पडलेली दिसली. त्यानंतर त्यांनी तिला पाण्यातुन बाहेर काढुन संजीवनी हॉस्पीटल, लोणावळा ता. मावळ जि. पुणे येथे घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद वय- 1 वर्षे 11 महिनेत ही तपासुन ती मयत असल्याचे घोषीत केले.

Saibaba Charitable Trust: साईबाबा चॅरीटेबल ट्रस्टचे विश्वस्त शेख यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

याघटणेबाबत लतीफ मुजावर, पोलीस उपनिरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे म्हणाले की मृत हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद हिचे कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकांच्या बंगल्यात नातेवाईकचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. सर्व कुटुंबिय सकाळी बंगल्याच्या तळ मजल्यावर नाश्ता करत होते. त्यावेळेस ती मुलगी जिना चढून चालत टेरेसवरील स्विमिंग पुल जवळ गेली व त्याच्या मध्ये पडल्याने मोठा आवाज झाला. सर्व जन वर जाऊन तिला पाण्यातून बाहेर काढले. तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

यापूर्वी 13 जुलै 2022 रोजी वाढदिवसाच्या आदल्या रात्री दोन वर्षीय चिमुरडा शिवबा पवार याचा असच एका बंगल्यातील स्वमिंग पुल मध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्याचा परिवार त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळा शहरात आले होते. यानंतर 19 जुलै 2022 रोजी स्विमिंग पूल मध्ये खेळल्यानंतर ओल्या शरीराने शेजारच्या लाईट ला हात लावल्यामुळे अरुण मसुद वाली या 13 वर्षाच्या मुलाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला होता.

या लागोपाठ घडलेल्या दोन घटणांमुळे व प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यामुळे लोणावळा नगरपरिषदेने अनधिकृत स्विमिंग पूलांचा सर्व्हे सुरू केला होता. या सर्व्हेवर नगरपरिषदेने काय कारवाई केली आहे? हे अजून कळाले नाही.

लोणावळा शहरात स्विमिंग पूल मुळे लहान मुलांचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. लोणावळा शहरातील खाजगी बंगल्यांमध्ये असलेले स्विमिंग पूल व त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोणावळा नगरपरिषदेने व लोणावळा शहर पोलिसांनी शहरातील अनधिकृत स्विमिंग पूल ची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.