Pune : माणिकबाग येथे आढळलेल्या तरुणीच्या खून प्रकरणात दोन तरुण ताब्यात.

एमपीसी न्यूज : तेजसा श्‍यामराव पायाळ (वय 29) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही तरुण तिला एका पार्टीमध्ये भेटले होते. त्यांच्याशी परियच झाल्यानंतर त्यांचा संपर्क वाढला होता.

_MPC_DIR_MPU_II

तेजसाचा मृत्यू झाला त्या दिवशी पार्टी केल्यानंतर हे दोन्ही तरुण घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते. मद्याच्या बाटल्या, हुक्का आदी सामग्री पोलिसांना तेथे सापडली होती.

मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा नोंदवला असला तरी खून की आत्महत्या या निष्कर्षावर पोलीस अजूनही पोचलेले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1