२० एप्रिल : दिनविशेष

What Happened on April 20, What happened on this day in history, April 20. See what historical events occurred, which famous people were born and who died on April 20.

२० एप्रिल : दिनविशेष

२० एप्रिल – महत्वाच्या घटना

  • १७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
    १९३९: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
    १९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
    १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
    २००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.

२० एप्रिल – जन्म

  • ७८८: आदि शंकराचार्य यांचा जन्म.
    १७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
    १८०८: फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८७३)
    १८८९: नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
    १८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९६८)
    १९१४: ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)
    १९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.
    १९५०: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.
    १९६६: याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म.
    १९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.

२० एप्रिल – मृत्यू

  • १९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन. (जन्म: ६ जून १८५०)
    १९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)
    १९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन. (जन्म: २४ जुलै १९११)
    १९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)
    १९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.