Chakan News : खेडमध्ये नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणारे अधिक, 13 नवे रुग्ण ; 20 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात रविवारी  (दि. 22 ) निच्चांकी रुग्ण मिळाले असून 8 गावे आणि 2 पालिकांमध्ये 13 रुग्ण मिळून आले आहेत.  तर 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  मेदनकरवाडी येथील 34 वर्षीय पुरुषाचा आणि कडधे येथील 42 वर्षीय महिलेचा निर्मय हॉस्पीटल येथे मृत्यू झाला आहे.  

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 116 झाला आहे. यापैकी 33 हजार 422 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. रविवारी दिवसभरात 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 198 सक्रिय रुग्ण आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 2 मृत्यूने 496 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 9 रुग्ण, चाकण 2, आळंदी 0 राजगुरुनगर 20असे एकूण 13 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे- चऱ्होली खु. ,चिंचोशी, जऊळके खु., नाणेकरवाडी, शेलपिंपळगाव, वेताळे, येलवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला असून कुरुळी येथे 2 रुग्ण मिळाले आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.