Pune News : चिकन सेंटरमधून 20 कोंबड्या चोरीला; आखाड पार्ट्या जोरात

एमपीसी न्यूज : पुण्यात सध्या आखाडाचा सीझन सुरूय आणि लोक आखाड पार्टी साजरी करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. हडपसरच्या हिंगणे मळ्यात असणाऱ्या एका चिकन सेंटरच्या दुकानातून चक्क वीस कोंबड्या चोरी चोरट्यांनी आखाड साजऱ्या करण्यासाठी केलीय. मात्र चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

हिंगणे मळ्यातील इस्लाम शेख हा चिकन विक्रेता नेहमीप्रमाणे रात्री चिकन सेंटर बंद करून घरी गेला.आज पहाटे साधारण तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ट्रिपल सीट वरून आलेल्या तिघा चोरट्यांनी पिंजर्‍यात ठेवलेला कोंबड्या लक्ष केले.

टाळा तोडत पिंजऱ्यातील कोंबड्या पोत्यात भरण्यास सुरुवात केली,पोत्यामध्ये तब्बल वीस कोंबडी भरल्यानंतर चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. याप्रकरणी चिकन विक्रेता हा पोलिसात तक्रार दाखल करणार असून आता पोलिसांसमोर कोंबड्या चोरांचा शोध घेण्याचे आव्हान असणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.