Vadgaon : मावळात आज 20 पॉझिटिव्ह; शहरी भागात 9, ग्रामीणमध्ये 11 रुग्ण कोरोनाबाधित

20 positive in Maval today; 9 in urban areas and 11 in rural areas : आजच्या अहवालात शहरी आणि ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये  घट  झाल्याचे दिसून येत आहे.

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज,  शुक्रवारी  विविध भागात मिळून एकूण 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरी भागातील 9 , तर ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला.  आजच्या अहवालात शहरी आणि ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये  घट  झाल्याचे दिसून येत आहे.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरी भागातील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत 7  , लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत हद्दीत प्रत्येकी 1  अशा 11 रुग्णांचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागामध्ये वराळे, कुसगाव बुद्रुक, इंदोरी, गहुंजे, सुदुंबरे, वाऊंड, बऊर, कांब्रे, वळख या दहा गावांमध्ये प्रत्येकी एक, तर सोमाटणे येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आजपर्यंत मावळ तालुक्यात एकूण 522  कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 195  रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 13  जणांचा मृत्यू झाला. 7  रुग्णांना आज, शुक्रवारी घरी सोडण्यात आले.

दरम्यान, आज एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतामध्ये वडगाव मावळ येथील 45 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या तरुणाला कोरोनासह मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही आजार होता.

सध्या तालुक्यात 314  सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 159 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, 155  रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असल्याची महिती तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.