Baramati News : विक्रीसाठी आणलेल्या 20 तलवारी जप्त, एकाला अटक

एमपीसी न्यूज : तलवारी घेऊन विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला बारामती पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून वीस तलवारी आणि एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले. नितीन मल्‍हारी खोमणे (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नितीन खोमणे हा बारामती शहरात तलवार विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने बांदल वाडीतील नीरा डावा कालवा लगत त्याला पकडले. नितीन खोमणे दुचाकीवरुन येत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

पोलिसांनी त्याच्या जवळ असलेल्या गोणीची तपासणी केली असता वीस तलवारी सापडल्या. नितीन खोमणे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी देखील गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.