Rajiv Gandhi Zoo : पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला एकाच दिवसांत 20 हजार नागरीकांनी दिली भेट

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने पुण्यातील कात्रज भागात असलेल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला तब्बल 20 हजार नागरीकांनी सोमवारी भेट दिली. एरवी शनिवार- रविवार मिळून येथे केवळ 10 हजार पर्यटक येत असतात, तर इतर दिवशी त्यापेक्षाही कमी लोक येत असतात.

नेहमीप्रमाणे सिंह, वाघ, हत्ती, शेखरु, सापांच्या जाती पाहण्यासाठी गर्दी असते. त्यात नव्याने केरळहून आलेल्या गवा किट्टू व अविका या जोडीची भर पडली. त्यामुळे वीस हजार पर्यटकांनी सुट्टीचा आनंद घेत प्राणिसंग्रहालयाला भेट दिली.यावेळी सात लाख 24 हजार रुपयांची तिकीट विक्री झाली आहे. त्याशिवाय 250 पर्यटकांनी पर्यावरण ई बसचा वापर करीत संग्रहालय बघितले.यामध्ये इ बसची दहा हजाराची तिकीट विक्री झाली. यामुळे मनपाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.

Atal Bihari Vajpayee : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे सादरीकरण

प्राणी संग्रहालयाला सोमवारी 19 हजार 323 पर्यटकांनी भेट दिली असून 7 लाख  24 हजाराचे उत्पन्न मिळाले.आनलाईन पेमेंटची सुविधा लवकरच सुरु करण्यात येणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.