Pune News : वाहतूक सेवा पुरविल्याचे 200 कोटी रुपये पीएमपीला द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

एमपीसी न्यूज : वाहतूक सेवा पुरविल्याबद्दल सुमारे 200 कोटी रुपये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमपीला तातडीने द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला. पीएमआरडीए क्षेत्रातील पीएमपीच्या वाहतुकीबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आदेश दिले.

 

पीएमपीकडून पीएमआरडीए क्षेत्रात 477 बसद्वारे दररोज वाहतुकीची सेवा दिली जाते. त्यासाठी दरमहा 188 कोटी रुपयांचा खर्च पीएमपीला येतो. सन 2021-22 या वर्षांचे पैसे मिळावेत, यासाठी पीएमपीकडून पीएमआरडीएकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यावर निर्णय होत नव्हता. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे पीएमपीकडून पीएमआरडीए क्षेत्रात बस वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकात पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया या वेळी उपस्थित होते.

 

Pune News : मरुमा फाउंडेशन आयोजित पहिला समर फेस्टिव्हल

 

दरम्यान, दोन्ही महापालिकांनी पीएमपीचा पुढील वर्षांत होणारा संभाव्य तोटा लक्षात घेऊन आपापल्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.(Pune News)  त्यावर पूर्ण आढावा घेऊन चर्चा करण्याचे ठरले. पीएमआरडीए क्षेत्रात तीन ठिकाणी पीएमपीचे आगार सुरू होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात बससेवेचा विस्तारही होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.