India Corona Update : मागील 24 तासांत 20,021 नवे रुग्ण, 279 जणांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत 20 हजार 21 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 02 लाख 07 हजार 871 एवढी झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात  21 हजार 131 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत देशात 97 लाख 82 हजार 669 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजघडीला देशात 2 लाख 77 हजार 301 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 16 कोटी 88 लाख 18 हजार 054 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 15 हजार 397 नमूने रविवारी (दि.27) तपासण्यात आले आहेत.

 

देशभरात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 901 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मागील 24 तासांत 279 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.81 टक्के एवढं आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.