बिशप्स एफसी कोल्टस, रुपाली एससी, कमांडोज संघांचा विजय

डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात बिशप्स एफसी कोल्टस, रुपाली एससी, कमांडोज या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.  

पीडीएफएच्या ढोबरवाडी येथील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निर्मल छेत्री (12,29,64मि)याच्या हॅट्ट्रिक कामगिरीच्या जोरावर बिशप्स एफसी कोल्टस संघाने सिटीक्लब संघाचा 4-0 असा सहज पराभव केला. रुपाली एससी संघाने जॉली रेंजहिल्स एफसीचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून संग्राम सातवने दोन गोल, तर क्षितिज पाटीलने एक गोल केला.

जायंट्स अ व उपसा अ यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. कमांडोज संघाने यंग वन्स संघावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्रथम श्रेणी गट:

बिशप्स एफसी कोल्टस: 4 (निर्मल छेत्री 12,29,64 मि, अनिश कुमार 77 मि) वि.वि.सिटीक्लब: 0;

रुपाली एससी: 3 (क्षितिज पाटील 3 मि., संग्राम सातव 19,59 मि.) वि.वि.जॉली रेंजहिल्स एफसी: 2 (प्रफुल चौधरी 39 मि., टोजी थॉमस 57 मि);

जायंट्स अ: 1 (अंशुल शर्मा 9 मि.) बरोबरी वि. उपसा अ: 1 (अपूर्व देसाई 61 मि.);

कमांडोज: 3 (लक्ष्मीनारायण बेल्लन 34 मि., शॉन थोंसर्जी 56 मि., अग्नेल पिल्ले 59 मि.) वि.वि.यंग वन्स: 0;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.