संचेती हॉस्पिटलच्या घरगुती आरोग्य सहाय्यक योजनेचे प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – संचेती हॉस्पिटलच्या घरगुती आरोग्य सहाय्यक योजनेचे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पद्मविभूषण डॉ. के एच संचेती म्हणाले की, संचेती हॉस्पिटलने घरगुती आरोग्य सहाय्यक योजना हा अल्पकालीन अभ्यासक्रम राबविला आहे. हा पाठ्यक्रम संचेती हेल्थकेअर अकॅडमी संचेती हॉस्पिटल गॅलंट्री मेडीकल अॅण्ड एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने चालविण्यात येईल. 1 मे रोजी याची सुरुवात होईल. अशा प्रकारचा पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात खूप उपयोगी ठरेल, छोट्या आणि किरकोळ प्रकारच्या वैद्यकीय समस्यांवर मात करण्याचे कौशल्य नक्कीच खूप उपयोगी आहे. प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद्घाटण होणे ही आमच्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे.

रुग्णांना आवश्यक मुलभूत आरोग्य सेवा व सुश्रूषा घरच्या घरी देण्यासाठी लागणारे आवश्यक कार्यपद्धत्तीचे ज्ञान, शिक्षण व प्रशिक्षण देणे. हा या पाठ्यक्रमाचा मुख्य उदेश्श आहे.  हा पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटल्स  प्रायव्हेट नर्सिंग होम्स, क्लिनिक्स, घरगुती आरोग्य सेवा, पाळणाघर, रिसेप्शन, वृद्धाश्रम व इतर अनेक ठिकाणी कामाच्या संधी मिळतील.

संचेती हेल्थकेयर अॅकॅडमीच्या एक्झिक्यूटिव डाईरेक्टर,मनीषा सांघवी या अभ्यासक्रमाची माहिती देताना म्हणाल्या की, दुखापतींवर कश्या प्रकारे उपचार केले जातात,  तातडीची वैद्यकीय मदत कशा प्रकारे केली जाऊ शकते हे या अभ्यासक्रमात शिकविले जाईल. हा आभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रामध्ये निश्चितच फायदेशील ठरेल.

वरील अभ्यासक्रम 8 वी ते 12 वी पास असलेल्या तसेच आजारी आणि अंपग व्यक्तींची मदत करण्याची इच्छा असलेल्या मुले व मुलींसाठी असून याची प्रवेशाची वयोमर्यादा किमान 17 वर्ष व कमाल 30 वर्ष अशी आहे, वरील व्यक्ती शारीरिक व मानसिक दृष्या सक्षम असणे आवश्यक आहे. गॅलंट्री मेडीकल अॅण्ड एज्युकेशनल ट्रस्टच्या  संस्थापिका व सेक्रेटरी शामल देसाई या वेळी बोलताना म्हणाल्या की, किरकोळ समस्यांच्या समाधानासाठी घरगुती आरोग्य सहाय्यक हा अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करने आमच्यासाठी गर्वाची बाब आहे, रुग्णांना आवश्यक व मुलभूत आरोग्य सेवा व सुश्रूषा देण्यासाठी आवश्यक कार्यपद्धत्तीचा अशा प्रकारचा अभ्यासक्रम ही काळाची गरज आहे.

प्रवेशक्षमता 25 ते 30 आसनांची आहे. पाठ्यक्रमाचा कालावधी 6 महिन्यांचा असेल, वार्षिक शिक्षण 60 तासांचे असून सर्व पाठ्यक्रम मराठीतून शिकविला जाईल, पाठ्यक्रमात शरीरशास्त्र मानसशास्त्र व त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम, संभाषण कला, मुलभूत नर्सिंग पद्धत्ती प्रथोमोपचार तसेच सामान्य आजारांचे व्यवस्थापन या विषयांचे ज्ञान दिले जाईल, वरील अभ्यासक्रमाचे वर्ग संचेती हेल्थकेअर अकॅडमी, शिवाजीनगर पुणे येथे होतील, हे प्रशिक्षण संचेती हॉस्पीटल, शिवाजी नगर पुणे येथे प्रभागीय नर्सिंग कर्मचा-यांच्या देखरेखी खाली होईल.

पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणा-या विद्यार्थांना संचेती हेल्थ केअर अकॅडमी व गॅलेंट्री मेडीकल अॅण्ड एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.