रविवार, फेब्रुवारी 5, 2023

राज्य उत्पादन शुल्क पथकाने अवैध दारूचा ट्रक पकडला

पाठोपाठ जीपमधून येणारा दारू मालकही ताब्यात

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने अवैध दारू घेऊन येणारा ट्रक सापळा रचून ताब्यात घेतला. हा ट्रक नगरहून पुण्याच्या दिशेने येत होता. कारवाईत ट्रकमधून 750 मिलीचे तब्बल 285 बॉक्स ताब्यात घेतले आहेत. तसेच जीपच्या मागे येणार्‍या दारू मालकाला त्याच्या जीपसह ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकार्‍यांना खबर्‍याकडून वाघोली परिसरात नगररस्त्याने  एमएच-13 एएक्स 2001 हा ट्रक अवैध दारू घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार केसनंद फाटा वाघोली येथे सापळा रचून ट्रक अडवून त्याची तपासणी केली. ट्रकमध्ये दारू साठवण्यासाठी करण्यात आलेल्या कप्प्यात गोवा निर्मित रिअल सेव्हन कंपनीची अवैध 750 मिलीचे 285 बॉक्स सापडले. ट्रकचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सूत्रधार मागून येणार असल्याचे सांगितले.

Latest news
Related news