कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांच्या पुतण्यावर पिंपरीत वार, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांच्या पुतण्यावर दोघांनी काचेच्या बाटलीने तोंडावर आणि डोक्यावर वार केले. ही घटना काल (गुरुवारी) रात्री दहाच्या सुमारास लोखंडे कामगार भवनसमोर घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवा प्रल्हाद कांबळे असे वार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश बोचकुरे (वय 24 रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गोकुळ उर्फ विकास कांबळे (वय 27) आणि सेलमन गायकवाड (वय 21 दोघेही रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवा कांबळे आणि त्याचा मित्र सुरेश बोचकुरे हे दोघे काल रात्रीच्या सुमारास पिंपरीतील कामगार भवनासमोर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आलेल्या आरोपींची शिवा कांबळे याच्यासोबत शाब्दिक चकामक झाली. यानंतर आरोपींनी शिवाच्या तोंडावर आणि डोक्यावर काचेच्या बाटलीने वार केले. यामध्ये शिवा जखमी झाला त्याला तात्काळ वायसीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.  
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.