शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

बावधान येथे स्कूल बसला अपघात ; सुदैवाने जिवीत हानी नाही

एमपीसी न्यूज –  कोथरुड जवळील  बावधान  पेट्रोलपंपाजवळ  आज (शुक्रवारी)  सकाळी आठच्या सुमारास स्कूलबसला अपघात झाला.  यावेळी बस रस्त्याच्या बाजूला  35 फुट खोल कोसळली. सुदैवाने यामध्ये विद्यार्थी नसल्यामुळे जिवीत हानी झाली नाही.

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना कोथरुडचे अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर म्हणाले की, सकाळी 7 वाजून 53 मिनिटांनी आम्हाला कॉल आला. यामध्ये बावधान पेट्रोल पंपाजवळील उतारावर ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्याने गाडी उतारावरुन येत असताना रस्त्याच्या बाजूच्या झाडाला घासून खाली कोसळली. ही बस  राजा शिवराय प्रतिष्ठान “न्यू इंडिया स्कूल"ची होती.

मात्र बसमध्ये केवळ ड्राव्हर व त्याचे सहकारी होते. विद्यार्थी कोणीच नसल्याने  मोठी हानी टळली. या अपघाताता चालक शेखर जोरी (वय 35) व सहकारी संध्या जाधव (वय 42) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ती बस  विद्यार्थ्यांना सोडून येत असल्यामुळे बस रिकामी होती.

spot_img
Latest news
Related news