पिंपरीतील सराईत गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

विशाल उर्फ सॅम्युअल डेडली अॅर्नाल्ड (रा. कामगारनगर, पिंपरी) असे तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा पिंपरी ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. पिंपरी पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी मंजुरी देताच विशाल याला पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून मुंबई पोलीस अॅक्ट कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.