शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

भोसरी गवळीनगर प्रभागात राष्ट्रवादीच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गवळीनगर प्रभाग क्रमांक 5 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत (नाना) आनंदराव लोंढे (अ), अनुराधा देविदास गोफणे (ब), कोमल अमर फुगे (क) आणि अजित दामोदर गव्हाणे (ड) यांनी गुरुवारी (दि.16) प्रभागात प्रचार फेरी काढली. प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने प्रचारफेरीत सहभागी झाले होते. 

भोसरीतील गव्हाणे पेट्रोल पंपापासून रॅलीला सुरुवात झाली. संत तुकारामनगर, नंदनवन कॉलनी, तुकाईमाता कॉलनी, साई सिद्धनगर, दिघी रोड, लक्ष्मीनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी,  हुतात्मा चौक, हनुमान कॉलनी, दुर्गामाता कॉलनी, जय महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, शास्त्री चौक, महादेवनगर,  सावंतनगर, गंगोत्री पार्क या मार्गे प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.

प्रचारफेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांनी ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण केले. ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देऊन उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी संपूर्ण गवळीनगर प्रभाग पिंजून काढला आहे. वैयक्तिक गाठी-भेटी घेऊन,  ‘डोअर टू डोअर’ प्रचार, रॅली काढून गवळीनगर प्रभाग राष्ट्रवादीमय केला आहे. राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांचा एकत्रित प्रचार जोरात सुरु आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराची विरोधकांनी मात्र चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे.

           
दहशत झुगारून नागरिक प्रचार फेरीत उत्स्फूर्तपणे सहभागी! 

राष्ट्रवादीची प्रचारपत्रके वाटणा-या एका अपंग कार्यकर्त्याला (गुरुवारी)  विद्यमान दमदार कार्यकर्त्यांनी विनाकारण मारहाण केली. भोसरीतील नागरिकांनी याचा तीव्र निषेध केला आहे. राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन नागरिकांनी दहशतीला सनदशीर मार्गाने उत्तर दिले आहे.

spot_img
Latest news
Related news