आकुर्डी-प्राधिकरणातील राष्ट्रवादी, भाजपचे उमेदवार अकार्यक्षम – प्रकाश ढवळे

एमपीसी न्यूज – आकुर्डी-प्राधिकरणातील शिवसेनेचे उमेदवार तरुण आणि उच्चशिक्षित आहे. आधी केले मग सांगितले याप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून या प्रभागातील जनतेची कामे करत आहेत. तर, राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांची निष्ठा जनतेशी नसून ते अकार्यक्षम आहेत, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा तर पालिकेत झालेल्या अनेक घोटाळ्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याची टीका कामगार नेते प्रकाश ढवळे यांनी केली. 

प्राधिकरण-आकुर्डी प्रभागातील शिवसेना पॅनेलचे उमेदवार अमित गावडे, राजेश फलके, सरिता साने, शर्मिला काळभोर यांनी आजवर प्रभागात पार पडलेल्या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर भाजपचे उमेदवार हे या प्रभागात आजवर झालेल्या कुठल्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत.  आयात केलेल्या या उमेदवारांची निष्ठा ना पक्षाशी आहे ना येथील जनतेशी आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी जनेतेने शिवसेनेच्या चारही उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहान कामगार नेते प्रकाश ढवळे यांनी केले.

या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी गावठाण, पंचतारानगर, गंगानगर, भेळ चौक या ठिकाणी चंद्रशेखर जोशी, अमोल निकम, निखील पांढरकर, प्रवीण धुले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोपरासभा घेण्यात आल्या. सभे दरम्यान त्यांनी प्राधिकरण-आकुर्डी परिसराच्या विकासासाठी मतदारांनी शिवसेनेच्या पॅनेललाच विजयी करावे, असे आवाहन केले. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या सभेला हजेरी शिवसेनेच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.