निवडणूक प्रचारासाठी वापरली जाणारी गावठी दारू जप्त;आरोपी फरार

एमपीसी न्यूज – पोलिसांनी डोके तालीम भागातून साडेतीनशे लिटर गावठी दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी गावठी दारूचा वाटप सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, आरोपी पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

प्रकाश कोबकर, असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी सोमवार पेठेतील डोके तालीम येथे प्रकाश कोबकर नावाचा व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू वाटप करत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवार पेठेतील डोके तालिमीच्या मागे असलेल्या सार्वजनिक संडासच्या गच्चीवर छापा  टाकून 8 हत्ती कॅन 100 पाऊच, अशी पंधरा हजार किमतीची 350 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. मात्र, त्यावेळी वाटप करणारा व्यक्ती पळून गेला असून याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.