शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या राष्ट्रवादीचे तीन स्टार प्रचारक

शरद पवारांची जाहीर सभा तर अजित पवार यांचा रोड शो

एमपीसी न्यूज – प्रचाराचे आता शेवटचे दोन दिवस राहिले असून पुण्यापोठापाठ आता पिंपरी-चिंचवडमध्येही शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसेच अजित पवार यांचा रोड शो व धनंजय मुंडे यांच्याही जाहीर सभा उद्या (शनिवारी) होणार आहेत.

यामध्ये शरद पवार यांच्या दोन जाहीर सभा होणार असून पहिली सभा सायंकाळी सहा वाजता जुनी सांगवी येथील  जलतरण तलावासमोर सभा होणार आहे. तर दुसरी सभा रात्री आठ वाजता भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाच्या बाजूच्या मैदानावर होणार आहे. तर अजित पवार यांची सकाळी नऊ वाजता दापोडी येथून सुरू होणार आहे. तसेच दुपारी साडेतीन वाजता नियोजित महापौर भवन येथे जाहीर सभा होणार आहे.

तर धनंजय मुंडे यांच्या सात कोपरा सभा होणार आहेत. या सभा सायंकाळी चारपासून सुरू होणार आहेत. त्या आकुर्डी, किवळेतील विकासनगर, स्पाईनरोड, रहाटणी, रामनगर, साने चौक, बालाजीनगर  येथे होणार आहेत.
spot_img
Latest news
Related news