पिंपरीत तडीपार गुन्हेगार पिस्तूलासह जेरबंद

एमपीसी न्यूज – तडीपार गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी पिस्तूलासह जेरबंद केले. ही कारवाई आज (शनिवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास रामनगर, चिंचवड येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.

 

रोहित दिलीप ढवळे (वय 25, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित ढवळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. शनिवारी रात्री तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन रामनगर येथे आला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला गजाआड केले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.