आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात ‘​झू​लॉजी असोसिएशन’ची स्थापना

एमपीसी न्यूज – पुण्यातील ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या झूलॉजी (प्राणी शास्त्र) विभागाच्या वतीने​ ‘ईझुकेशन’​ या ​‘झुलॉजी असोसिएशन’ ची स्थापना करण्यात आली आहे.
 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सहायक प्राध्यापक डॉ. नरहरी ग्रामपुरोहित यांच्या हस्ते असोसिएशनचे उद्‌घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे झूलॉजी विभागप्रमुख डॉ. इशरत शेख यांनी स्वागत केले. 
 
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शैला बुटवाला होत्या. सुमैय्या शेख यांनी आभार मानले. आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या झूलॉजी (प्राणी शास्त्र) विभागातर्फे या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<