नातेवाईक निवडणूक लढत असल्याने विरोधकांकडून दिघी-भोसरी रस्त्याचे काम – चंद्रकांत वाळके

 एमपीसी न्यूज – नातेवाईक निवडणूक लढवत असल्याने दिघी-भोसरी दरम्यान जोडणा-या रस्त्यावर मुरुम टाकून रस्त्याचे काम केले जात आहे. डांबरीकरण  केले जात नाही. तनिष संस्कृतीमध्ये मात्र  डांबरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम महापालिकेच्या निधीतून होत आहे की राज्य सरकारच्या निधीतून होत आहे, असा असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक व प्रचार प्रमुख चंद्रकांत वाळके यांनी दिघीतील कोपरा सभेत उपस्थित केला. 
 

शिवनगरी, आदर्शनगर, शिवशाहीरनगर या भागात प्रभाग क्रमांक 4 दिघी-बोपखेलचे राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत लक्ष्मण इंगळे (अ), बाळू गंगाराम लांडे (ब), वृषाली समीर झपके-घुले (क), कल्पना चंद्रकांत वाळके (ड) यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी कोपरा सभेत वाळके बोलत होते. यावेळी अण्णा गायकावड, शांतीलाल पाटील, अजित देसाई, अमित बन्सल, रवी अग्रवाल, सुधाकर भोसले, गणेश तुपे आदी उपस्थित होते.

दिघी-भोसरी रस्त्याचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात प्रलंबित असतानाही नातेवाईक निवडणूक लढवत असल्यामुळे दिघी-भोसरी दरम्यान जोडणा-या रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता करत असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जात असून ही निव्वळ धूळफेक आहे. त्या रस्त्यावर मुरुम टाकला जात आहे, डांबरीकरण का केले जात नाही, असा प्रश्न  वाळके यांनी उपस्थित केला.  नागरिकांच्या हितासाठी जर हा निर्णय घेतला असेल तर या रस्त्याचे काम रात्री-अपरात्री का केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

 दिघी-बोपखलेचा राष्ट्रवादीने गेल्या 10 वर्षात महापालिकेच्या माध्यमातून विकास केला आहे. नागरिकांनी सर्व मुलभूत सोयीसुविधा पुरविल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येनुसार आणखी सोयीसुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रवादी सक्षम आहे. राष्ट्रवादीकडे विकासाचे  ‘व्हीजन’ आहे. त्यामुळे नागरिकांनी राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून देण्याचे आवाहन, वाळके यांनी मतदारांना केले. 

राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दिघी-बोपखेल प्रभाग पिंजून काढला आहे. ‘डोअर टू डोअर’, प्रचार फेरी, वैयक्तिक गाठी-भेटी घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांचा एकत्रित प्रचार सुरु आहे. विरोधकांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराची मात्र चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे.

{fcomment}

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.