बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

महापालिका निवडणुकांसाठी उबरची खास वोटर राईड

मतदानासाठी मतदारांना दिली दर सवलत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने उबर या टॅक्सी कंपनीतर्फे  पुणे व पिंपरी-चिंचवडच्या मतदारांना 21 फेब्रुवारी म्हणजे मतदानाच्या दिवशी खास व्होटर राईड ठेवणार आहेत. ज्यामध्ये मतदारांना मतदानाला जाण्यासाठी राईडमध्ये खास सवलत दिली जाणार आहे.

मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी उबर कंपनीने ही ऑफर देऊ केली आहे. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडच्या  मतदारांना त्यांच्या जवळील म्हणजे 5 किमी अंतरावरील मतदान केंद्रावर जाण्यासाठी 49 रुपयांची सवलत दिली जाणार आहे. ही राईड सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. 5 किमीच्यापुढे उबर कंपनीच्या नेहमीच्या दराने दर आकारले जातील.

याविषयी बोलताना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, उबर यांची  ही कल्पना खूप छान आहे.त्यामुळे जो उच्चशिक्षित वर्ग जो मतदानाबद्दल थोडा निरस आहे, त्यांना मतदानसाठी प्रवृत्त करण्यासाठी ही उत्तम कल्पना आहे. त्यासाठी महापालिकाही संपुर्ण सहकार्य करेल, असे कौतुक आयुक्तांनी केले.

तसेच उबरचे कार्यकारी व्यवस्थापक बन्सी कोटेचा म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीला मतदारांनी मतदान करावे, यासाठी आम्ही ही कल्पना राबवत आहोत .मतदानाच्या प्रक्रीयेत आमचा सहभाग आहे याचा आम्हाला आनंद आहे. तसेच उबरसाठी काम करणारे चालक किंवा सहका-यांमध्येही मतदानाची जनजागृती आम्ही करत आहोत असेही, त्यांनी सांगितले आहे.   

पीसीसीएफचे अमोल देशपांडे यांनी याविषयी सांगितले की, उबेरच्या या कल्पनेमुळे नोकरदारांना सुट्टी न काढता  कमी वेळात मतदान करायला जाणे शक्य होणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंपरी महापालिका आणि उबेरने हा पुढाकार घेतला आहे, ती अभिनंदनीय बाब आहे. 

मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून विविध कल्पना उपाय योजना राबवल्या जात आहे. याचा फायदा घेत मतदारांनी मतदान करुन मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे केले जात आहे.

{fcomment}

spot_img
Latest news
Related news