भाजपच्या बँकेत मत ठेवा, पाचपट विकास करुन दाखवू – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – गुंतवणूक करताना आपण नेहमीच चांगल्या बँकेचा विचार करतो. राष्ट्रवादीच्या बँकेत आता काहीच राहिले नाही. आमची बँक चांगली आहे. या बँकेत मताचे डिपॉझिट ठेवले तर पिंपरी-चिंचवड शहराचा पाच पट विकास होईल. त्यामुळे नागरिकांनी राष्ट्रवादीच्या बंद पडलेल्या बँकेत ‘वोट’ करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवारी) पिंपरीत केले. 

 

भाजपच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप,  खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, रवींद्र अनासपुरे, उमा खापरे, माऊली थोरात आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शास्तीकर लावला असे सांगत फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत केली जातील. शास्तीकर रद्द केला जाईल. शरद पवार संरक्षणमंत्री असताना रेडझोनचा प्रश्न सुटला नाही. परंतु, कालच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रेड झोनचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले आहे. 

                     
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा रिमोट कंट्रोल अजित पवार यांच्या हातात होता. त्यामुळे शहरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षणाच खासगीकरण झाले आहे. त्यासाठी भरमसाट पैसा लागतो, हे पाहून सरकारने राजश्री शाहू महाराज योजना तयार करून गरीबांसाठी शिक्षणाची सोय केली आहे. महापालिकेच्या जोरावर आपला पक्ष चालवून राष्ट्रवादी वाल्यांनी आपली घरे भरली आहेत. भाजपला सत्ता दिल्यास महापालिकेत पारदर्शी कारभार करणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
"cm
 
"cm
 
"cm
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.