लोणावळा ग्रामीण पोलिसांची दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी परिसरातील दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी दिली.
किरण येवले (वाकसई), मंगेश देशमुख व रवींद्र देशमुख (देवघर), शुभम गाडे, जयराम भोसले व किरण साळवी (कुसगाव), भाऊ गायकवाड, अनंता घुले व वैभव गायकवाड (ओळकाईवाडी), अशोक ठुले (डोंगरगाव), अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ग्रामीण परिसरातील कुसगाव व पवनानगर ही दोन गावे संवेदनशील घोषित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे.