पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांचा रोड शो

एमपीसी न्यूज – चौका-चौकात केले जाणारे स्वागत…. तरुणाईची मोठी गर्दी…. कार्यकर्त्यांचा उत्साह.. ”एकच वादा अजितदादा” आणि ‘राष्ट्रवादी’ पुन्हाच्या दिल्या जाणा-या घोषणा अशा वातावरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘रोड शो’ आज (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहराच्या मतदार संघात सुरु आहे.  शहराच्या तीनही विधानसभा मतदार संघात रॅली काढून पवार मतदारांशी संवाद साधत आहेत.

दोपाडी येथून रोड शोला सुरुवात झाली. रॅलीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे सहभागी झाले होते. इतर पदाधिकारी टप्प्याने रॅलीत सहभागी होत होते. 

पवार यांच्या सोबत प्रत्येक प्रभागातील उमेदवार रोड शोमध्ये सहभागी होत होते. आपला प्रभाग संपला की उमेदवार बाहेर जात होते.  दुस-या प्रभागातील उमेदवार रॅलीत सहभागी होत होते. कार्यकर्तेही आपला प्रभाग संपला की दुचाकी घेऊन बाहेर पडत होते. त्या प्रभागातील उमेदवारचे कार्यकर्ते रोड शोमध्ये सहभागी होत होते.  
 दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, लिंकरोड, चापेकर चौक, बिजलीनगर, प्रमलोकपार्क, खंडोबामाळ, मोरवाडी, नेहरुनगर, आचर्य अत्रे, लांडेवाडी, दिघी रोड अशा मार्ग रॅली काढण्यात आली असून दिघीतील डॉ. आंबेडकर मैदानावर कोपरा सभा होणार आहे.  

आळंदी रोड, नाशिक हायवे, धावडे वस्ती, इंद्रायणी नगर, स्पाईनरोड, साईनाथनगर, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी गावठाण, म्हाळसाकांत चौक, प्राधिकरण, भेळ चौक यानंतर निगडीतील महापौर भवनच्या नियोजीत जागी दुपारी साडे तीन वाजता जाहीर सभा होणार आहे.

{fcomment}

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.