कारभारी बदला म्हणजे काँग्रेसला बदला आणि भाजपला आणा – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुण्याची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे इतकी वर्ष असताना त्यांनी शहराचा विकास केला नाही, अशी टीका करत कारभारी बदला म्हणजे काँग्रेसला बदला आणि भाजपला आणा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेत केले. 

 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट यांची पत्रकार परिषद आज पुण्यात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, प्रत्यक्षात 6 टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे होते. मात्र, पुणे महापालिकेने 1.5 टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करीत आहे. याला जबाबदार कोण? अशी टीका अजित पवार यांचे नाव न घेता केली. तसेच आम्ही कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. हे काम राजकीय इच्छा शक्ती असेल तर होऊ शकते, अशा शद्बात महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. त्याचबरोबर पुणे महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळणार, जनता आमच्या सोबत, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.