महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पिंपरीत संचलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी परिमंडळ तीनच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी हद्दीत सशस्त्र संचलन केले. 

परिमंडळ तीनमधील पिंपरी-चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, वाकड, सांगवी ठाण्याच्या हद्दीत हे सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून संचलनास सुरुवात झाली. 

पिंपरी ओव्हरब्रीज, शगुन चौक, गुरुद्वारा, गेलार्ड चौक, जमतानी चौक, डीलक्स चौक, मिलिंदनगर, झुलेलाल मंदिर, रिव्हर रोड, भाटनगर मार्गे संचलन करण्यात आले. यामध्ये परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगाळीकर, मसाजी काळे आदींसह महिला व पुरुष पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

"police"
"police
"police

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.