शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

उच्चशिक्षित नवदाम्पत्याची चिखलीत आत्महत्या

एमपीसी न्यूज – उच्चशिक्षित नवदाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार काल (रविवारी) संध्याकाळी चिखलीच्या मोरेवस्ती भागात उघडकीस आला. आत्महत्येमागील नेमके कारण अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अनिकेत विलास ढमाले (वय 25) व अश्विनी अनिकेत ढमाले (वय 22) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. अनिकेत हा मेकेनिकल इंजिनिअर तर अश्विनी ही फैशन डिझायनर होती. त्यांचे 13 महिन्यांपूर्वीच एक जानेवारी 2016 ला त्यांचे लग्न झाले होते. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

 

अनिकेत हा चिखली मोरेवस्ती येथील साने चौकाजवळ सुदर्शननगरमध्ये आई, वडील आणि भावाबरोबर राहात होता. आई-वडील एका लग्न समारंभासाठी तर भाऊ बाहेर गेलेला असताना या दोघांनी आत्महत्या केली.

 

अनिकेतचा भाऊ घरी आल्यावर त्याने दार वाजवले. बराच वेळ काहीही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी हॉलमधील पंख्याच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेला अनिकेतचा मृतदेह आढळला तर आत बेडरुममध्ये याच पद्धतीने गळफास घेतलेला अश्विनीचा मृतदेह आढळून आला.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णायलात पाठवले. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

{fcomment}

spot_img
Latest news
Related news