शनिवार, डिसेंबर 3, 2022

वडगावशेरीत प्रचाराची पत्रके चिकटवताना दोन शिवसैनिकांसह इतर दोघांना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – वडगावशेरीत प्रचाराची पत्रके भिंतीवर चिकटवताना शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांनासह इतर दोन मुलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यामुळे प्रचाराची मुदत संपल्यानंतरही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिका निवडणूक प्रचाराची मुदत काल रविवारी सायंकाळी साडेपाचनंतर संपली. त्यानुसार सर्वच पक्षांच्या प्रचाराची काल सांगता झाली. त्यानंतर छुप्या पद्धतीने प्रचार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा कार्यन्वीत झाली होती. आज वडगाव शेरी भागात नगरसेवक सचिन भगत या शिवसेनेच्या उमेदवाराची प्रचार पत्रके भिंतीवर चिकटवताना शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना तसेच इतर दोन मुलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यामुळे छुप्या पद्धतीने प्रचार सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे. 

या पत्रकावर, आपल्या गणेशनगर भागातील नागरिकांनी धनुष्यबाणासमोरील चारही बटणे दाबावीत व आपल्याला बी.जे.पी., राष्ट्रवादी  व इतर पक्षातील लोक पैसे वाटतील.. ते पैसे घ्या.. पण फक्त शिवसेनेलाच मतदान करा. व यांचेवरील राग व्यक्त करावा, कारण आपली ताटातूट केली आहे.  येथील परिसरातील सर्व विकासकामे मी स्वतःच करणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. आपली हक्काची व्यक्ती.., असा मजकूर छापला आहे. हे पत्रक परिसरातील भिंतीवर चिकटवले आहे. ही पत्रके चिकटवताना पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. 
पोलीस पुढील कारवाई करीत आहे.
Latest news
Related news