अखेर मतदानाची वेळ संपली ; आता निकालाची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत साधारणपणे तीस टक्के मतदान झाले आहे. मात्र मतदानाची वेळ साडेपाच वाजता संपल्यामुळे मतदान केंद्रात प्रवेश झालेल्या मतदारांना मतदान करता येणार असून मतदान केंद्राच्या बाहेरही अनेक मतदारांची गर्दी झालेली आहे. हे मतदार केंद्रात प्रवेश करण्यासाठी पोलिसांसोबत हुज्जत घालत आहेत.

 

यादरम्यान शेवटच्या टप्प्यातील मतदान चालू असताना निगडीतील ओटास्किम येथील केंद्रावरील मशीन बंद पडल्याने काही वेळासाठी मतदान थांबवण्यात आले आहे. मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.  प्रभाग क्रमांक 13 निगडी, येथील मधुकरराव पवळे मतदान केंद्रातील इव्हीएम मशीन बंद पडली असल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला होता. मात्र, मशिन चालू असल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले

 

या, दरम्यान काही प्रभागांमध्ये तणावाचे वातावरण झाल्याचेही पाहायला मिळत आहे. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ केली आहे. प्रत्येक प्रभागातील पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार जास्तीत जास्त मतदरांनी मतदान करावे. यासाठी मतदारराजाला विनवणी करताना दिसून येत आहे. तर त्यांचे कार्यकर्ते ज्यांचे मतदान राहिले राहिले आहे, अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. तर काही कर्यकर्ते मतदारांना फोन करून वेळ संपत आल्याचे लक्षात आणून देऊन मतदान करण्यासाठी येण्याची विनंती करत आहेत.

आज दिवसभारत अनेक नेते, सेलिब्रेटींनी आपापला मतदानाचा अधिकार बजावला आहे. तर काही नव मतदरांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यामुळे त्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद दिसून येत आहे. सर्वच नेते आणि सेलिब्रेटी मतदरांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. लोकशाहीचा शेवटचा टप्पा म्हणजे मतदान असून तो हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे, असे काही सेलीब्रेटींनी आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

दिवसभरात मतदानाची टक्केवारी कमी असली तरी शेवटच्या काही तासात ही आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
"ota"

"ota

"ota

"ota

"ota

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.