मतदार यादीचा सावळा गोंधळ; मतदारांना शोधूनही मिळेना मतदान केंद्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 127 जागांसाठी 1 हजार 608 मतदान केंद्रावर आज मतदान झाले. मात्र, ज्या मतदारांनी यापूर्वी दोन-तीन वेळाच मतदान केले आहे, अशा मतदारांची नावेच मतदार यादीत नसल्याने मतदारांना मतदानच करता आले नाही, अशा तक्रारी पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागातून दिवसभर येत होत्या.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही मतदान करत आहोत. तसेच आम्हाला जी मतदार यादी मिळाली त्यामध्ये नाव आहे म्हणून त्यात दिलेल्या प्रभागात गेल्यानंतर केंद्रावर तुमचे या मतदार यादीत नाव नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही मतदान कोणाला करणार, असा प्रश्न विचारला असता प्रशासनानेही उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी तक्रार मतदारांमधून येत होती. काहींच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन यादीत मतदाराचे नाव आहे. मात्र, प्रत्यक्षात मतदानकेंद्रावर नाही. त्यानंतर शोधा-शोध केली असता भलत्याच प्रभागाच्या मतदानकेंद्रावर नाव आले होते.

याविषयी प्रशासानाशी विचारणा केली असता, काही मतदारांना उमेदवारांनी विधानसभेची मतदार यादी दिलेली आहे. त्यामुळे त्यांना जुन्या यादीनुसार मतदानकेंद्र दाखवले गेले. मात्र, नवीन यादीत त्यांची नावे  योग्य त्या मतदान केंद्रावरच होते, असे उत्तर दिले.

मात्र, मतदार यादीतील या सावळ्या गोंधळामुळे अनेक मतदार मतदानाला मुकले. तसेच अनेक मतदारांमध्ये प्रशासनाने योग्य ती मदत न केल्यामुळे मतदान करता आले नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.