डॉ. शाळीग्राम भंडारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – तळेगाव लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या वैद्यकीय, साहित्य, समाजसेवा या क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत त्यांना तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. के.एच. संचेती व अरुण फिरोदिया, अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. भंडारी यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच साहित्य, समाजसेवा या क्षेत्रात भरीव काम केले आहे. समाजातील वंचित घटकांसाठीही  त्यांनी नि:स्वार्थी भावनेने योगदान दिले आहे. पाचाणे येथील शांताबाई येवले मुलींचे वसतीगृह या सेवाभावी संस्थेस ते प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत करतात. माजी नगरसेविका (कै.) डॉ. विजया शाळीग्राम भंडारी  यांच्या नावाने वस्तीगृहाची उभारणी केली आहे. तसेच त्यांनी तळेगाव येथे  स्वखर्चाने सार्वजनिक बसथांबा उभारला आहे. दादा-दादी पार्कमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 


तळेगाव लायन्स क्लबच्या माध्यमातून डॉ. भंडारी यांचे योगदान हे अतुलनीय आहे, असे  गौरवद्धगार  डॉ. संचेती यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. फिरोदीया यांनीही डॉ. भंडारी यांचे कौतुक केले. तळेगावमधील सर्व लायन्स सदस्यांनी डॉ. भंडारी यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.