पोलिसांच्या कडक बंदोबस्ताने किरकोळ घटना सोडून पुण्यातील मतदान शांततेत

एमपीसी न्यूज – काही किरकोळ घटना वगळता पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे महापालिका  निवडणुकांसाठी मतदान शांततेत पार पडले. नियंत्रण कक्षाकडे दिवसभरात पैसे वाटपाचे व इतर शंभरपेक्षा जास्त कॉल आले आहेत. त्यातील बहुतांश कॉल बोगस असल्याचे दिसून आले.

शहर पोलिसांकडून पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांसाठी दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व सहआयुक्त रामानंद हे बंदोबस्तावर नजर ठेवून होते. पोलीस आयुक्त व सहआयुक्तांनी मतदान केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. तसेच, रामानंद हे कायदा-सुव्यवस्थेवर नजर ठेवून होते.

मतदान सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी किरकोळ घटना घडल्या. जमावाला पांगविण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला. तसेच, विरोधी कार्यकर्ते समोरासमोर येणार नाहीत याची काळजी घेतली जात होती. काही ठिकाणी विरोधी कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली, अशी माहिती पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.