धनकवडीत भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मारामारी?

सूत्रांची माहिती; मात्र पोलिसांचा इन्कार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडले. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात धनकवडीत भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजते. पोलिसांनी मात्र, या वृत्ताचा इन्कार केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडीत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने येऊन त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. तसेच भाजपच्या निलेश भीमताडे याला मारहाण करण्यात आली, असे वृत्त आहे.

मात्र, पोलिसांनी असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. सहकारनगर पोलिसांनी शेवटच्या टप्प्यात सर्व पोलीस दलाला एकत्र करून मतदान केंद्रावर पथ संचलन केले. व त्या ठिकाणी घोळका करून थांबलेल्यांना हाकलून दिले तर काही ठिकाणी थोडा लाठी चार्ज केला. मात्र या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा गोंधळ व मारामारी झालेली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.