सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

घरफोडी करणा-या नेपाळी टोळीच्या चतु:श्रृंगी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज – रो हाऊस आणि फ्लॅटमध्ये चो-या करणा-या सहा जणांच्या सुरक्षारक्षक नेपाळी टोळीला चतु:श्रुंगी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून सात किलो चांदी, 65 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

 

दीपक उर्फ गुरू रंगनाथ जोशी (वय-33, नालासोपारा, जि. पालघर, मूळ नेपाळ), सागर देवराज ख्याती (वय-33, कामगार मगर, पिंपरी, पुणे, मूळ नेपाळ), पदमबहादूर लच्छीबहादूर शाही (वय-43, रा. खांडेवस्ती भोसरी, मूळ नेपाळ) जगत कालू शाही (वय-35, रा. कस्पटे वस्ती, वाकड, मूळ नेपाळ), जनक गोरख शाही (वय-40, रा.मल्हारनगर, काळेवाडी, पुणे, मूळ नेपाळ) आणि गगन उर्फ काल्या कोपुरे कामी (वय-27, रा.शिवनेरी पार्क, बालेवाडी, मूळ नेपाळ), अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील शिपाई प्रवीण पाटील यांना पाच ते सहा इसम माउली पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येणार असल्याची  माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या टिमने पल्लोड फार्म बाणेर येथून वरील आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता, गुप्ती, सत्तूर, एअरगन, हातोडी, दोरी, मिरची पूड जप्त केली. अटक केल्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये केलेल्या चौकशीत त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 घरफोड्या केल्याचे कबूल केले. त्यांच्या ताब्यातून 23 लाख 22 हजार 600 किमतीचे 646 ग्रॅम सोन्याचे दागिने व सहा किलो चांदी जप्त करण्यात आली.

spot_img
Latest news
Related news