गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

पुणे विमानतळावर स्पाईस जेट विमानाची काच फुटल्याने उड्डाण आठ तास उशिरा

एमपीसी न्यूज – पुण्याहून दिल्लीला जाण्या-या  स्पाईस जेट विमानाची काच फुटल्याने खोळंबा झाला असून आज सकाळी 7.20 ला जाणा-या विमानाची उड्डाणाची वेळ दुपारी तान वाजताची करण्यात आली आहे. 

 

स्पाईस जेटचे SG999 हे विमान पुण्याहून दिल्लीला जात होते. दरम्यान, काच फुटल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला असून याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. या विमानातील अनेक प्रवाशी सध्या पुणे विमानतळावर अडकून पडले आहेत. त्यामुळे या प्रवाशांकडून स्पाईस जेटच्या प्रशासनाकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Latest news
Related news