वाकडमध्ये बुलेटच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव बुलेटच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.18) रात्री दहाच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

 

संगठप्रसाद छांगेर जैसवाल (वय 42, रा. थेरवाव), असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रामआसरे जैसवाल (वय 49, रा. शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संगठप्रसाद हे शनिवारी रात्री थेरगाव येथून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या (एमएच 14, एफ व्ही 7066) बुलेटवरील चालकाने त्यांना जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने संगठप्रसाद यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर बुलेटचालकाने  घटनास्थळी न थांबता पोबारा केला.

वाकड ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस. जे. गोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.