कृष्णानगर, भाटनगर येथे रात्री उशिरापर्यंत मतदान; रात्री साडेनऊला शेवट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी काल रात्री साडेनऊ पर्यंत मतदान सुरू होते. यामध्ये भाटनगर व कृष्णानगर येथे रात्री उशिरापर्यंत मतदान चालू असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम आकडेवारी कळण्यासही विलंब झाला. 

विषेशकरून प्रभाग क्रमांक 11 मधील कृष्णानगर व प्रभाग क्रमांक 19 मधील भाटनगर येथे रात्री सव्वानऊ ते साडेनऊच्या दरम्यान मतदान चालू होते. या दोन्हीही मतदान केंद्रावर शेवटच्या दोन तासात मतदारांनी गर्दी केली. त्यामुळे साडेपाच उलटून गेले तरी मतदारांच्या मतदानकेंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. त्यानुसार प्रभाग क्रमांक 11 मध्ये 66.16 टक्के मतदान  झालेले आहे. तर 19 प्रभागात 59.50 टक्के मतदान झालेले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात एकंदरीत सकाळच्या सदरात चांगले मतदान झाले. तर दुपारी बारापासून मतदान केंद्रावरची मतदारांची गर्दी ओसरत गेली.  त्यानंतर कडक उन्हामुळे  दुपारी बारा ते चारपर्यंत मतदानकेंद्रावर बोटावर मोजण्या इतपत मतदार होते. उन्हाची तिव्रता कमी व्हायला लागली तशी मतदारांची संख्याही वाढली. त्यानंतर मतदानाची वेळ संपली तरीही मतदान केंद्रावर लांबच-लांब रांगा होत्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मतदारांनी  रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मतदान केले. यावर्षी एकूण 65.35 टक्के मतदान झाले. यावर्षी  गेल्यावर्षीच्या मतदानापेक्षा 10.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.