वंदना चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खासदार अॅडव्होकेट वंदना चव्हाण यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला आहे.

 

पुणे महापालिका निवडणूक 21 फेब्रूवारीला पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीने विजय आमचाच होणार म्हणून दावा केला होता. आज मतमोजणी झाली असून त्यापैकी 122 जागांचे निकाल सायंकाळी साडेपाच पर्यंत हाती आले आहे. त्यानुसार, भाजपला एकहाती सत्ता मिळाली असून राष्ट्रवादीला केवळ 29 जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचा झालेला या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. 

शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी मी पूर्ण क्षमतेने पक्ष संघटनेचे काम करणार आहे.तसेच पक्षानी नियुक्त केलेल्या नवीन अध्यक्षाला माझे पूर्ण सहकार्य राहील,असे खासदार वंदना चव्हाण यांनी राजीनामा दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.