शनिवार, डिसेंबर 3, 2022

मावळातील व्यापा-याचे अपहरण करणारे जेरबंद, व्यापा-याची सुखरुप सुटका

गुन्हा घडल्यापासून अवघ्या पंधरा तासात आरोपी अटकेत, चार आरोपींची शोध सुरू

एमपीसी न्यूज – चांदखेड ( ता.मावळ) येथील व्यापारी अपहरण प्रकरणातील सात पैकी तीन आरोपींना गुन्हा घडल्यापासून अवघ्या पंधरा तासात अटक करण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून व्यापा-याची सुखरूप सुटका झाली आहे.


या प्रकरणातील आरोपी शुभम शशिकांत गायकवाड(वय22), ओंकार वसंत पांचाळ(वय 23, दोघेही रा.सोमाटणे, ता.मावळ), सचिन सुनील शेफर्ड (वय25 रा.नगर)या तिघांना सोमाटणे फाटा परिसरात गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली. गुन्हयात वापरलेल्या मोटारीसह अन्य चार आरोपी फरारी आहेत.

 

अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदखेड येथील जितेंद्र शांतीलाल शहा(वय 52)या व्यापा-याचे रिव्हाल्वरचा धाक दाखवून राखाड्या रंगाच्या मोटारीतून सात जणांनी बुधवारी रात्री आठच्या सुमारास चंदणवाडी जवळील उतारावर अपहरण केले. त्यानंतर व्यापा-याच्या डोळ्यावर घट्ट कापडी पट्टी बांधण्यात आली होती. तसेच त्यांना मारहाण करत अपहरणकरत्यांनी व्यापा-यास औरंगाबाद जवळील पंढरपूर येथे सोडून दिले.

मु-हे परिवार व शहा परिवारामध्ये जमिनीच्या जागेवरील वाद न्यायप्रविष्ट आहे.अपहरणामागे या कारणासह अन्य शक्यताही पोलीस पडताळून पहात आहेत.अपहरणासंदर्भात राजेंद्र शांतीलाल शहा(वय53,रा.चांदखेड)यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी आरोपींना वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आसल्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी सांगितले. फरारी आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक राम जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश होडगर, अंकुश माने , राजेश रामाघरे,पोलीस हवालदार राजेंद्र मिरघे,सुनील जावळे, दता बनसोडे,गणेश महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

Latest news
Related news