शनिवार, डिसेंबर 3, 2022

कसबा पेठ – सोमवार पेठेतील अटीतटीच्या लढतीत रवींद्र धंगेकरांची बाजी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील कसबा पेठ आणि सोमवार पेठेतील प्रभागात झालेल्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि पालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांचा 3 हजार 700 मतांनी पराभव केला.

तीन वाजल्यानंतर या प्रभागातील मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीदरम्यान धंगेकर यांनी1 हजार मतांची आघाडी घेत बिडकर यांना मागे टाकले होते. अखेरीस पाचव्या फेरीअखेर धंगेकर यांनी 18426 मते मिळवत गणेश बिडकर यांचा 3 हजार सातशे मतांनी पराभव केला. रवींद्र धंगेकर यांना 18426 मते मिळाली तर गणेश बीडकर यांना 14230 मते मिळाली.

निवडणुकीच्या तोंडावर धंगेकर यांनी काँग्रेमध्ये प्रवेश करत या प्रभागातून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतू एनवेळी काही अडचणीमुळे त्यांना अपक्ष म्हणून सामोरे जावे लागले. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते.

 

ही लढत अटीतटीची होणार हे यापुर्वीच स्पष्ट झाले होते. कारण पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना झाल्यानंतर मनसेत असलेल्या धंगेकर यांनी खासदार संजय काकडे यांच्या मदतीने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्न केला होता. कारण रवींद्र धंगेकर यांच्या प्रवेशाने आपल्या राजकीय वाटचालीस अडथळा निर्माण होऊ शकतो या कारणास्तव पालकमंत्री गिरीश बापट आणि गणेश बिडकर यांनी विरोध केला होता. त्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे निवडणुकीपुर्वीच ही लढत अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले होते.

 

या विजयानंतर रवींद्र धंगेकर म्हणाले, भाजपकडून उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलाविले होते. मात्र मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुमच्या पक्षातील कनिष्ठ पातळीवरील लोकांशी माझे जमत नाही. त्यामुळे तुम्हाला मला पक्षात घेता येणार नाही. मी स्पष्टपणे बोलल्याने चर्चा तिथेच थांबली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने तयार केलेल्या अतंर्गत अहवालात मी निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने मला बोलावण्यात आले होते.

 

Latest news
Related news