…अन् कावळ्याची झाली सुटका

एमपीसी न्यूज – बिजलीनगर येथे दक्ष नागरिक व पक्षीप्रेमींनी मांज्यात अडकलेल्या कावळ्याची अग्निशामक दलाच्या मदतीने सुटका केली.

बिजलीनगर येथील साई शिव-वैष्णवी पार्कसमोर, सुखनगरी जवळ दोन नारळाच्या झाडांमध्ये पतंग-मांजा व दोरा अडकला होता. त्या दोऱ्यामध्ये कावळा सापडला. तो सुटकेकरिता प्रयत्न करत असल्याचे तसेच अनेक कावळे त्या परिसरात ओरडताना तसेच घिरट्या घालत असल्याचे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पक्षीप्रेमी विजय जगताप आणि विजय पाटील यांना आढळून आले.

त्यांनी त्वरित अग्निशामक दलास कळविले. माहिती मिळताच अवघ्या 20 मिनिटातच संत तुकाराम नगर अग्निशामक दलाचे वरिष्ठ कर्मचारी शंकर पाटील, नामदेव वाघे, प्रदीप हिले, विकास बोनंगाळे, विशाल जाधव, सुशीलकुमार राणे, मयूर कुंभार घटनास्थळी पोहोचले, त्या ठिकाणी असलेल्या दुमजली इमारतीच्या छतावरून लोखंडी आकडा आणि दोरीच्या साह्याने मांज्यातून त्या मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या कावळ्याची सुटका केली. त्यानंतर काही सेकंदातच त्या कावळ्याने आकाशात भरारी घेतली. कावळा वाचविण्यात यश आल्यामुळे परिसरातील नागरिक आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.