पिंपरी-चिंचवडमध्ये पती-पत्नी करणार महापालिकेत प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा  निवडणुकीचा रणसंग्राम संपला. या रणसंग्राममध्ये नाना काटे व शीतल काटे या दोन जोडीचा विजय झाला. यामध्ये शीतल काटे यांनी 12 हजार 462 मते तर नाना काटे यांनी 12 हजार 994 मतांनी दणदणीत विजय मिळविला.

पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मधून राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे व त्यांच्या पत्नी शीतल काटे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. तर प्रभाग क्रमांक 23 थेरगावमधून सतीश दगडू दरेकर यांना तर प्रभाग क्रमांक 24 मधून आदित्य बिर्ला म्हातोबानगरमधून त्यांच्या पत्नी माधुरी सतीश दरेकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती.

मात्र, या दोघांचाही पराभव झाला. प्रभाग क्रमांक 25 मधून मयुर कलाटे तर प्रभाग क्रमांक 26 मधून त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका स्वाती मयुर कलाटे या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित होत्या. मात्र, यामध्ये मयुर कलाटे निवडून आले असून त्यांच्या पत्नीचा पराभव पत्कारावा लागला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी चिखले प्रभाग क्रमांक 13 निगडी गावठाणातून निवडणूक लढवित होते. त्यामध्ये सचिन चिखले निवडून आले असून त्यांच्या पत्नी अश्विनी चिखले पराभूत झाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.