मतदानापूर्वी गुड न्यूज मिळालेल्या मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरेंना निकालानंतर बॅड न्यूज

भाजपच्या उमेदवाराकडून स्वीकारावा लागला पराभव
एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवलेल्या मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे या गरोदर होत्या. दरम्यान, प्रचार करत असताना प्रसवकळा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मुलगा झाला होता. त्यामुळे निकालाआधीच त्यांना गूड न्यूज मिळाली होती. त्यामुळे महापालिकेत विजयाच्या रुपाने देखील गूड न्यूज मिळण्याची वाट पाहणा-या पाटील यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला आणि त्यांना बॅड न्यूजचा सामना करावा लागला.
10 फेब्रुवारीला त्या शनिवार पेठेत आणि-सदाशिव पेठेत पदयात्रेद्वारे प्रचार करत असताना त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या होत्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले आणि शनिवारी सकाळी त्यांनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्या दोन दिवसांनी प्रचारासाठी बाहेर देखील पडल्या होत्या. विजयाची खात्री असतानाच त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला.
पुणे महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप 98 जागावर विजय मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला 40, काँग्रेस 11, शिवसेना 10, तर मनसेला 2 जागा मिळाल्या आहेत.