गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

देहूरोडमध्ये ट्रकच्या धडकेत फोर्स मोटार्समध्ये काम करणा-या तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रकला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून आलेल्या मोटारीने धडक दिल्याने ट्रकच्या चाकाखाली अडकून  फोर्स मोटार्समध्ये काम करणा-या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 24) रात्री आठच्या सुमारास देहूरोड येथील केंद्रीय शाळेसमोर घडला. 
 

विजय धनाजीराव देशमुख (वय 22, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरकणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा मूळचा साता-याचा रहिवाशी आहे. तळेगाव दाभाडे येथे तो बहिणीकडे राहत होत. फोर्स मोटार्स कंपनीत तो नोकरी करत होता. शुक्रवारी रात्री विजय पुणे-मुंबई महामार्गावरुन तळेगावरुन पुण्याच्या दिशेने दुचाकीवरुन जात होता.
 

देहूरोड येथील केंद्रीय शाळेसमोरुन जात असताना विजय ट्रकला ओव्हरटेक करत होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका मोटारीने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने विजय ट्रकच्या चाकाखाली जाऊन पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

Latest news
Related news