शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पोस्टर प्रकरणी अभाविप व एसएफआय यांच्यात झालेला वाद दुर्दैवी – वासुदेव गाडे

एमपीसी न्यूज – अभाविप आणि एसएफआय यांच्या दरम्यान शुक्रवारी रात्री पोस्टर लावण्या प्रकरणी झालेला वाद हा अंत्यत दुर्देवी आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी व्यक्त केले.

 

त्या प्रकरणासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशा घटना रोखण्यासाठी 160 सुरुक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल रात्री पोस्टर लावल्यावरून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि अखिल भारतीय परिषदेचे (अभाविप) विद्यार्थी या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये तुफान हाणामारी झाली.  याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोन्ही संघटनांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून दोन्ही संघटनेच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

spot_img
Latest news
Related news